शेत पाणंद रस्त्यांच्या भुसावळ सह अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची नियुक्ती !

0
5

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – महाराष्ट्र शासनाच्या शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी आता तालुक्यातील शेतकऱ्यांना संपर्क करता यावा व शेत पाणंद रस्ते योजनेतून शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी आता नुकतेच अनेक तालुक्यात सह अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यात भुसावळ तालुक्यातील शेत पाणंद रस्ते योजना सह अध्यक्षपदी सुनसगाव येथील रहिवासी व भाजपा जिल्हा सरचिटणीस भालचंद्र शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता काही दिवसांपूर्वी भालचंद्र पाटील यांच्या वर भुसावळ ग्रामीण पश्चिम भाजपा मंडळ प्रमुख पदी वर्णी लागली होती आणि आता पुन्हा शेत पाणंद रस्ते योजना सह अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती करताना रस्ता हा महत्त्वाचा असतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रभावीपणे शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता तयार करण्याची जबाबदारी घेऊन ज्या ठिकाणी काही वाद असतील ते वाद सुद्धा सामंजस्याने तोडगा काढून मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

Spread the love