‘जोपर्यंत महाराजांचे ऐतिहासिक स्मारक पूर्ण होत नाही, तोपर्यंत समितीसोबत ठाम उभे राहू’
किनगाव : मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य ऐतिहासिक स्मारकाच्या कामाला गती देऊन प्रकल्प लवकर पूर्ण करावा, या मागणीसाठी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांच्या वतीने विविध शासकीय स्तरांवर पत्रव्यवहार सुरू आहे.
समितीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांकडे निवेदने व पत्रव्यवहार करून स्मारकाच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे.
मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्मारकाच्या मागणीबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी हा मुद्दा आपण उचलून धरू तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक स्मारक पूर्ण होईपर्यंत समितीसोबत ठामपणे उभे राहू, अशी भूमिका व्यक्त केल्याचे समितीने सांगितले. हे होते उपस्थित
चंद्रकांत विठ्ठल चौधरी, उमाकांत रामराव पाटील, प्रशांत भगवान पाटील, पंकज सुधाकर हिवराळे, रोहित भिवसन पाटील, सर्फराज युनूस पिंजारी, अफजल सुभान तडवी आणि दीपक कैलास कोळी उपस्थित होते.
दरम्यान, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हा दीर्घकाळापासून चर्चेत असलेला प्रकल्प असून, त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी समितीने शासनाचे लक्ष वेधण्याची भूमिका घेतली आहे.











