प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे गावातील बरीच विकास कामे अपूर्ण आहेत. ग्रामविकास युवा मंच च्या माध्यमातून काही कामे सुरू केली जात आहेत.ठिक ठिकाणी ग्रामपंचायत सहकार्य करीत असली तरी जास्तीत जास्त विकास कामे व्हावीत यासाठी ग्रामविकास युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून येत्या दि.३१ ऑक्टोबर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अन्यथा दि.१ नोव्हेंबर २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे गावातील
पाटील पांथा , हनुमान मंदीरा मागील रस्ता, नवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता रुंदीकरण , महिला शौचालयाची दुरुस्ती व रंगरंगोटी , गटारी साफसफाई करणे , मुलींसाठी अभ्यासिका तयार करणे , के टी वेअर बंधाऱ्यातून वाळू उपसा करणे, हायमस्ट लॅम्प लावणे , सामाजिक सभागृहाचा व्यायाम शाळेसाठी वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी , आर ओ प्लॅन्ट ची दुरुस्ती करून शुद्ध पाणी मिळणे बाबत, घंटागाडी उपलब्ध करून देणे , अंगणवाडी जवळ स्वच्छतेचा प्रश्न , मराठी शाळेत पिण्याच्या पाण्याची टाकी तयार करणे, गावात म्हणी लिहिणे व गावातील झाडांना चूना व गेरु लावणे. अशा मागण्या आहेत. दि.२८ ऑक्टोबर रोजी मासिक सभेत मागण्या हे निवेदन सादर करण्यात येईल आणि सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्यात येईल तसेच उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही असे सरपंच सौ.काजल कोळी यांनी सांगितले आहे. गावात ग्रामविकास युवा मंच च्या माध्यमातून कामांना गती मिळाली आहे त्यामुळे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.










