प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ –गावाचा विकास केवळ सरकारी योजनांमधून होत नसतो, तर त्यासाठी गावकऱ्यांची इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते. याच विचाराला कृतीची जोड देत कुऱ्हे (पानाचे) येथे राबविण्यात आलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाने एक सकारात्मक आदर्श निर्माण केला.
या स्वच्छता अभियानाला भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) श्री. कुलदीप जयसिंग ठाकरे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. गौतम वाढे यांनी भेट दिली. विशेष म्हणजे त्यांनी केवळ अभियानाची पाहणी न करता स्वतः श्रमदानात सहभागी होत स्वच्छतेच्या कामात हातभार लावला.
गावातील तरुणांनी कोणत्याही राजकीय भेदभावाशिवाय, सामाजिक बांधिलकीतून स्वच्छता अभियानात घेतलेला उत्स्फूर्त सहभाग पाहून गटविकास अधिकारी श्री. कुलदीप ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.
“*कुऱ्हे पानाचे येथील तरुणांनी ग्रामस्वच्छता अभियान पाहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, याचा मला सात्त्विक आनंद आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या*.
या अभियानाच्या माध्यमातून गावाच्या स्वच्छतेबरोबरच लोकसहभाग, एकजूट आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होणे ही ग्रामस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब ठरली.
श्रमदानात सहभागी मान्यवर व ग्रामस्थ
कुलदीप जयसिंग ठाकरे (गटविकास अधिकारी), गौतम वाढे (विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत), मा. जि प. सदस्य समाधान पवार श्रीकांत बरकले, योगेश पाटील, अतुल पाटील, अरविंद बावस्कर, राजेंद्र पाटील (माजी सैनिक), किरण बरकले, गणेश रोनखेडे, निलेश डांबरे, प्रशांत पालोदे, सचिन रंदाळे, ग्रामविकास अधिकारी, संजय पाटील, सुनील जैन, प्रमोद उंबरकर, विजू उंबरकर, राहुल सौदागर, तुळशीराम बरकले, भूषण भारुडे, सतीश पाटील, चेतन सपकाळे, महेश मेघे, संतोष चौधरी सर, विकास धांडे, संजय वराडे, संदीप पेंटर, संजय कोळी, बाळू वराडे, संतोष सपकाळे, सिद्धान्त बहिलम, विकास बारी, प्रशांत नागपुरे, मधुकर पाटील, रविंद्र रंदाळे, लीलाधर पाटील (TC), खुशाल पाटील, गणेश अहीर, रमाकांत रोनखेडे, सागर आनंदा पाटील, हिमांशू काळे, कुणाल पाटील, प्रशांत काकडे, निखील पाटील, सिद्धार्थ पारधे, प्रमोद पारधी, दशरथ पाटील, अनिल बारी, सुधाकर बडगुजर, पराग पंकज चौधरी आदींनी श्रमदानात सहभाग नोंदविला.












