सौ.रजनीताई सावकारे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – भुसावळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातून भाजपचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांच्या सौभाग्यवती तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनीताई संजय सावकारे यांची जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालिका म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सौ रजनीताई सावकारे या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून महिलांच्या सामाजिक , शैक्षणिक , आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात . त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात नक्कीच उपयोग होणार आहे.

ताईंची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

Spread the love