प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दिवाळीनिमित्त किल्ले तयार करण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
उत्कृष्ट किल्ला तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
‘ किल्ले तयार करत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अभ्यास देखील विद्यार्थ्यांच्या मनात रुजतो असे तुषार रंधे यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मंजू बारी , वसंत पाटील , इब्रान तडवी , सुषमा पाटील , रूपाली चौधरी , तुषार रंधे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने किल्ले तयार करताना दिसत होते.












