आयोजित कार्यक्रमांमध्ये 22 राज्यांमधून 108 संस्था यांना आमंत्रित करण्यात आले होते.
राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,बिहार, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, तामिळनाडू व महाराष्ट्र असा अनेक 22 राज्यातून 108 पुरस्कार विजेते यांना सन्मानित करण्यात आले. सदर अवॉर्ड मध्ये रक्तदान चळवळ, देहदान, शैक्षणिक क्षेत्र, SDP डोनेशन, रिझर्व रक्तदादा, रक्तदान शिबिर आयोजक, सामाजिक क्षेत्र, रुग्णसेवक. अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचा नॅशनल अवॉर्ड संपन्न झाला बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया आयोजित नॅशनल अवॉर्ड सन 2026 ने सन्मानित करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील बरबडा गावाचे भूमिपुत्र तथा जवाहरलाल नेहरू विद्यालय येथील आदर्श राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त शिक्षक नागोराव मारोती तिप्पलवाड उर्फ एन टी सर बरबडेकर यांना देखील त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एन टी सर बरबडेकर हे ओ निगेटिव्ह रक्तदाता आहेत त्यांनी आतापर्यंत 25 वेळा रक्तदान करून अनेक गरीब व गरजू लोकांचे प्राण वाचवले व तासगाव जिल्हा सांगली येथे आयोजित कार्यक्रमात 26 वे रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा पुरस्कार सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात मातोश्री प्रतिष्ठान हॉल सांगली येथे आयोजक बॉम्बे ब्लड ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम यादव सर यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमास अध्यक्ष स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम, पोलिस उपनिरीक्षक श्री भंडारे सर,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम धायगुडे, अभिजीत कौलगे, गणेश माने, पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चौगुले, वैभव यादव, अभिजीत बुधले, आसिफ आत्तार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात एन टी सर बरबडेकर यांच्या सुमधुर आवाजातील महाराष्ट्र गीताने झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक संजय काळे, आभार आसिफ आत्तार यांनी मानले.












