लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 151 जयंती शेतकऱ्यांच्या बांधावर साजरी !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – भुसावळ लेवाहितवादी चळवळीतर्फे राज्यावर दुष्काळाचा सावट बघता लेवा हितवादी चळवळीतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरदार पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती निमित्ताने शेतकऱ्यांवर आलेला संकट त्यांना बळ देण्यासाठी त्यांना भावनिक आधार द्यावा. त्यांना तन-मन धनाने मदत करावी. या दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना बी बियाणे खत पुरविणे ,शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणे, शेतकऱ्यांना आवश्यक टँकर पुरवठा करणे, तसेच त्यांना किराणामाल वगैरे विविध प्रकारची मदत पुरवण्याचे आवाहन यावेळी लेवाहितवादीचे चळवळीचे मुख्य प्रवर्तक शिशिर जावळे यांनी केले. यावेळी संत सेवा मंडळाचे प्रकाश जैस्वाल , व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक श्री सुरेंद्र सिंग पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी निसर्गाचा समतोल राखण्याचा सुद्धा आवाहन केलं आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन केले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख देवेंद्र वराडे, मुरलीधर लोखंडे, यशवंत दादा पाटील, मिलिंद धांडे, वासुदेव कोल्हे, बापू दादा महाजन, श्री शंकर भुसे, तुकाराम खाचणे प्रांजल पाटील, ॲड.सागर सरोदे, आर.के.कोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Spread the love