प्रतिनिधि – अमीर पटेल
यावल – नगर पालिका हद्दीतील विविध ठिकाणी नवीन पाणी पाईप लाईन टाकण्यात आले आहे .
काही ठिकाणी व्यवस्थित पणे पाणी येत नसल्याने नागरिकांची तक्रारी नुसार विविध ठीकणी जॉईट पाईप लाऊन त्या भागात पाणी पुरवठा सोई करण्यात आले आहे. नुकतेच गंगा नगर आणि गणपती नगर व आयेशा नगर येथे मुख्य मार्गावर या जॉइंट लावण्यात आले असून गणपती नगर व आयेशा नगर येथे पाणी वाहत राहते त्या मुळे व्यवस्थित पाणी येत नाही अशी तक्रार गंगा नगर येथील रहिवासी यांनी केली होती . त्या बाबत गणपती नगर व आयेशा नगर येथे मुख्य मार्गावर पाणी पाईप लाईन ला जॉइंट लावण्यात आले होते पण सदर जॉइंट वारंवार निघत असते .पाणी रस्त्यावर येवून पाइ चालणाऱ्यां नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे.युवक काँग्रेस चे यावल रावेर विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी तुटलेले जॉइंट ला जोडण्या साठी तोंडी अर्ज मा.मुख्याधिकारी यावल नगर परिषद यांच्चाकडे केले होते. सदर नगरपरिषदेने दखल न घेतल्यामुळे सदर अर्जाची लेखी तक्रार यांनी दिनांक २१/१०/२२ रोजी केली.
निवेदन देताना वेळी विधानसभा अध्यक्ष फैजान शाह,आदिल शे.नसीम,कपिल खान,अनवर खान,सरफराज शाह,आदिल सय्यद, आदि कार्यकर्ते उपस्थित होते











