ममुराबाद येथे १४वा वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या अपहारा बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सो,पोलीस निरीक्षक ता.पो.स्टेशन जळगाव यांचेकडे तक्रार दाखल.

0
48

ममुराबाद-: येथे काही दिवसा पूर्वी १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या अपहाराबाबत भ्रष्ट्राचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी जि,प,चे,मुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच दिनांक 22 रोजी म पोलीस निरीक्षक सो तालुका पोलीस स्टेशन जळगाव यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की नं. 1 नामे- मुरलीधर एकनाथ उशीर, तत्कालीन ग्रामसेवक, ममुराबाद, ता.जि. जळगांव नं.2 नामे- हेमंत गोविंदा चौधरी, (सरपंच) ममुराबाद, ता. जि. जळगांव, मुरलीधर एकनाथ उशीर हा जुन-2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मौजे ममुराबाद येथे प्रभारी ग्रामसेवक म्हणुन कार्यरत होता व सद्यस्थितीत त्याची नेमणुक ही मौजे म्हसावद येथे ग्रामसेवक म्हणुन झालेली आहे. हेमंत गोविंदा चौधरी हा सद्यस्थितीत ममुराबाद या गावाचा सरपंच आहे.

ग्रामसेवक सरपंच यांनी, शासनातर्फे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या चौदाव्या वित्त आयोगातील निधी मधुन, कोणतेही टेंडर न काढता व कोणतेही जाहीर निविदा न काढता, निव्वळ स्वतःचा बेकायदेशीर आर्थिक फायदा व लाभ तसेच शासनाचा व शासकीय रकमेचा कायदेशीर आर्थिक नुकसान व तोटा होण्याच्या मलीन हेतुने, संगनमताने व फौजदारी कट-कारस्थान रचुन खालीलप्रमाणे शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार करून भ्रष्टाचार केलेला आहे, त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे:

नैतिक एन्टरप्राईजेस, दुकान नं. 164, छोरिया मार्केट, रावेर, ता. रावेर, जि.जळगांव यांचेकडुन खालील शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी केलेले आहेत. त्याबाबतचा तपशील खालील प्रमाणे आहे:

1) टेबल:- प्रती टेबल मुळ किंमत रक्कम रुपये 6,000/- मात्र इतकी असतांना, सदर आरोपींनी प्रती टेबल रक्कम रुपये 12,000/- मात्र याप्रमाणे एकुण 06 टेबलांचे रक्कम रुपये 72,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातून आरोपींनी शासनाचे रक्कम रुपये 36,000/- मात्रचे नुकसान केलेले असुन सदर रकमेचा स्वतःच्या बेकायदेशीर फायद्यासाठी व शासनाच्या कायदेशीर नुकसानासाठी संगनमताने अपहार केलेला असुन भ्रष्टाचार केलेला आहे.

2) टेबल: आरोपींनी वर नमुद टेबल खरेदी केल्यानंतर देखील पुन्हा टेबल नैतिक एंन्टरप्राईजेस यांचेचकडुन खरेदी केलेले असुन, प्रती टेबल मुळ किंमत रक्कम रुपये 6,000/- मात्र इतकी असतांना, सदर आरोपींनी प्रती टेबल रक्कम रुपये 12,000/- मात्र याप्रमाणे एकुण 02 टेबलांचे रक्कम रुपये 24,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एंन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातून संबधीतांनी शासनाचे रक्कम रुपये 12,000/ मात्रचे नुकसान केलेले आहे.

3) खुर्ची:- प्रती खुर्ची मुळ किंमत रक्कम रुपये 600/- मात्र इतकी असतांना, सदर आरोपींनी प्रती खुर्ची रक्कम रुपये 982/- मात्र याप्रमाणे एकुण 18 खुर्च्याचे रक्कम रुपये 17,676/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एंन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातून आरोपींनी शासनाचे रक्कम रुपये 6,876/ मात्रचे नुकसान केलेले आहे.

4) खुर्ची:- आरोपीनी वर नमुद खुर्ची खरेदी केल्यानंतर देखील पुन्हा खूची नैतिक एंन्टरप्राईजेस यांचेचकडुन खरेदी केलेली असुन, प्रती खुर्ची मुळ किंमत रक्कम रुपये 600/- मात्र इतकी असतांना,प्रती खुर्ची रक्कम रुपये 981/- मात्र याप्रमाणे एकुण 04 खुर्चीचे रक्कम रुपये 3,924 /- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एंन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 1,524 /- मात्रचे नुकसान केलेले आहे.

5) सिलींग फॅन:- प्रती सिलींग फॅन मुळ किंमत रक्कम रुपये 1,950/- मात्र इतकी असतांना, प्रती सिलींग फॅन रक्कम रुपये 3,800/- मात्र याप्रमाणे एकुण 09 सिलींग फॅनचे रक्कम रुपये 34,200/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 16,650/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

6)वर नमुद सिलींग फॅन खरेदी केल्यानंतर देखील पुन्हा सिलींग फॅन नैतिक एंन्टरप्राईजेस यांचेचकडुन खरेदी केलेले असुन, प्रती सिलींग फॅन मुळ किंमत रक्कम रुपये 1,950/- मात्र इतकी असतांना,प्रती सिलींग फॅन रक्कम रुपये 3,800/- मात्र याप्रमाणे एकुण 02 सिलींग फॅनचे रक्कम रुपये 7,600/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एंन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 3,700/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

प्रती कपाट मुळ किंमत रक्कम रुपये 7,200/- मात्र इतकी असतांना प्रती कपाट रक्कम रुपये 15,700/- मात्र याप्रमाणे एकुण 03 कपाटचे रक्कम रुपये 47,100/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 25,500/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

8)ट्रॉली स्पिकर:-किंमत रक्कम रुपये 9,000/- मात्र इतकी असतांना प्रती ट्रॉली स्पिकर रक्कम रुपये 15,500/- मात्र याप्रमाणे एकुण 01 ट्रॉली स्पिकरचे रक्कम रुपये 15,500/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एंन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 6,500/- मात्रचे नुकसान केलेले आहे .

9) कपाट (05 फुट ) :-मुळ किंमत रक्कम रुपये 6,800/- मात्र इतकी असतांना, प्रती कपाट रक्कम रुपये 15,600/- मात्र याप्रमाणे एकुण 02 कपाटचे रक्कम रुपये 31,200 मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 17,600/- मात्रचे नुकसान केलेले आहे.                                                                10) कपाट (06 फुट):- मुळ किंमत रक्कम रुपये 7,200/- मात्र इतकी असतांना, प्रती कपाट रक्कम रुपये 15,700/- मात्र याप्रमाणे एकुण 01 कपाटचे रक्कम रुपये 15,700/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 8,500/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

11) कपाट (05 फुट ) वर नमुद कपाट खरेदी केल्यानंतर देखील पुन्हा कपाट नैतिक एंन्टरप्राईजेस यांचेचकडुन खरेदी केलेला असुन, प्रती कपाट मुळ किंमत रक्कम रुपये 6,800/ मात्र इतकी असतांना, प्रती कपाट रक्कम रुपये 15,600/- मात्र याप्रमाणे एकुण 01 कपाटचे रक्कम रुपये 15,600/- मात्र इतकी अवाजवी रक्कम नैतिक एन्टरप्राईजेस यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 8,800/- मात्रचे नुकसान केलेले आहे .

ए टू झेड सप्लायर्स, प्लॉट नं. 11, श्री साई गजानन पार्क, धरणगांव जि.जळगांव,यांचेकडुन खालील शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी केलेले आहेत.

1) ऑल ईन वन डेस्कटॉप (संगणक):-MRP रक्कम रुपये 74,660/- मात्र इतकी असतांना, संगणक रक्कम रुपये 92,000/- मात्र प्रमाणे एकुण 01 संगणकाचे रक्कम रुपये 92,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम

टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 17,340/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

कपाट:- मुळ किंमत रक्कम रुपये 7,200/- मात्र इतकी असतांना, प्रती कपाट रक्कम रुपये 15,600/- मात्र याप्रमाणे एकुण 05 कपाटचे रक्कम रुपये 78,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातून शासनाचे रक्कम रुपये 36,000/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

3) वॉल फॅन-: मुळ किंमत रक्कम रुपये 2,000/ मात्र इतकी असतांना प्रती वॉल फॅन रक्कम रुपये 5,600 /-मात्र याप्रमाणे एकुण 02 वॉल फॅनचे रक्कम रुपये 11,200 /- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातून शासनाचे रक्कम रुपये 7,200/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

4) व्हील चेअर:- मुळ किंमत रक्कम रुपये 6,000/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती व्हील चेअर रक्कम रुपये 15,700/- मात्र याप्रमाणे एकुण 03 व्हील चेअर चे रक्कम रुपये 31,400/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 29,100/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

बेबी-स्केल:- मुळ किंमत रक्कम रुपये 1,600/- मात्र इतकी असतांना, प्रती बेबी स्केल रक्कम रुपये 3,000/- मात्र याप्रमाणे एकुण 09 बेबी स्केल चे रक्कम रुपये 27,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 12,600/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

6)पर्सनल स्केल:- मुळ किंमत रक्कम रुपये 8,00/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती पर्सनल स्केल रक्कम रुपये 2,850/- मात्र याप्रमाणे एकुण 09 पर्सनल स्केल चे रक्कम रुपये 25,650/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 18,400/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

7)स्टेडीओ मीटर:- मुळ किंमत रक्कम रुपये 1,300/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती स्टेडीओ मीटर रक्कम रुपये 2,100/- मात्र याप्रमाणे एकुण 09 स्टेडीओ मीटर चे रक्कम रुपये 19,800 मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 7,200/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

8)ईन फ्रंटोमीटर:- मुळ किंमत रक्कम रुपये 1,400 /- मात्र इतकी असतांना, सदर प्रती ईन फ्रंटोमीटर रक्कम रुपये 2,000/- मात्र याप्रमाणे एकुण 09 ईन फ्रंटोमीटर चे रक्कम रुपये 18,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 5,400/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

9) सिलींग फॅन:- मुळ किंमत रक्कम रुपये 1,950/- मात्र इतकी असतांना प्रती सिलींग फॅन रक्कम रुपये 3,800/- मात्र याप्रमाणे एकुण 09 सिलींग फॅनचे रक्कम रुपये 34,200/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 17,100/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

10) खुर्ची:- मुळ किंमत रक्कम रुपये 600/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती खुर्ची रक्कम रुपये 947/- मात्र याप्रमाणे एकुण 18 खुर्च्याचे रक्कम रुपये 17,046/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 6,246/ मात्रचे नुकसान केलेले आहे.

11) स्टील बेंच थ्री सिटर:- मुळ किंमत रक्कम रुपये 11,000/- मात्र इतकी असतांना स्टील बेंच रक्कम रुपये 15,300/- मात्र याप्रमाणे एकुण 01 स्टील बेंच थ्री सिटर चे रक्कम रुपये 15,300/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 4,300/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

12) प्रिंटर्स:- MRP किंमत रक्कम रुपये 13,199/- मात्र इतकी असतांना, सदर प्रिंटर्स रक्कम रुपये 32,000/- मात्र याप्रमाणे एकुण 01 प्रिंटर्स चे रक्कम रुपये 32,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन आरोपींनी शासनाचे रक्कम रुपये 18,801/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

13)वर नमुद सिलींग फॅन खरेदी केल्यानंतर देखील पुन्हा सिलींग फॅन ए टू झेड सप्लायर्स यांचेचकडुन खरेदी केलेला असुन, प्रती सिलींग फॅन मुळ किंमत रक्कम रुपये 1,950/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती सिलींग फॅन रक्कम रुपये 3,800/- मात्र याप्रमाणे एकुण 06 सिलींग फॅनचे रक्कम रुपये 22,800/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 9,250 /- मात्रचे नुकसान केलेले आहे.

14) मेगा फोन:- मुळ किंमत रक्कम रुपये 8,00/- मात्र इतकी असतांना प्रती मेगा फोन रक्कम रुपये 1,600/ मात्र याप्रमाणे एकुण 01 मेगा फोन चे रक्कम रुपये 1,600/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन आरोपींनी शासनाचे रक्कम रुपये 8,00/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

15) टेबल:- मुळ किंमत रक्कम रुपये 6,000/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती टेबल रक्कम रुपये 10,800 /- मात्र याप्रमाणे एकुण 09 टेबलाचे रक्कम रुपये 97,200/- मात्र इतकी अवाजवी रक्कम ए टू झेड सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातुन शासनाचे रक्कम रुपये 43,200/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

16) त्याचप्रमाणे स्वामी सप्लायर्स, शिंदखेडा जि.धुळे, यांचेकडुन खालील शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी केलेले आहेत. त्याबाबतचा तपशील खालील प्रमाणे आहे:

1) डेस्क:- मुळ किंमत रक्कम रुपये 2,500/- मात्र इतकी असतांना, सदर प्रती डेस्क रक्कम रुपये 10,000/- मात्र याप्रमाणे एकुण 20 डेस्कचे रक्कम रुपये 2,00,000/- मात्र इतकी अवाजवी रक्कम स्वामी सप्लायर्स यांना अदा केलेली असुन सदर व्यवहारातून शासनाचे रक्कम रुपये 1,50,000/- मात्रचे नुकसान केलेले आहे.

17) तसेच पेडकाई देवी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, चोपडा, जि.जळगांव, पत्ता- दुकान नं.3, नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्पलेक्स, यावल रोड, चोपडा, ता. चोपडा, जि. जळगांव, यांचेकडुन ग्रामपंचायत सदस्यांचा कोणताही अभ्यास दौरा व प्रशिक्षण न करता, निव्वळ प्रशिक्षणाच्या नावाखाली सदर संस्थेला ग्रामपंचायत ममुराबाद यांचेकडुन रक्कम रुपये 1,80,000/- मात्र इतकी रक्कम अदा केलेली असुन सदर संस्थेचा व स्वतःचा बेकायदेशीर आर्थिक फायदा व शासनाचे कायदेशीर असे आर्थिक नुकसान केलेले आहे.

18) सरपंच ग्रामसेवक यांनी एकमेकांसोबत संगनमत करुन व फौजदारी कट कारस्थान रचुन स्वतःचा बेकायदेशीर आर्थिक फायदा करुन घेतलेला आहे. यांना सदर वर नमुद दुकानांमधुन माल खरेदीसाठी तसेच सदर वर नमुद दुकांनांना रक्कम अदा करण्याबाबत कोणतीही संमत्ती नसल्याबाबतचे व मौजे ममुराबाद ग्रा.पं. ता. जि. जळगांव यांच्या दिनांक 03/08/2022 रोजी झालेल्या मासिक सभेत मंजुर केलेले 14 वा वित्त आयोग निधी अंतर्गत झालेल्या खर्चास, सरपंच

वगळता सर्व ग्रामपंचायत सदस्यांची नामंजुरी व हरकत असल्याबाबतचे लेखी पत्र देखील, सरपंच वगळता सर्व सदस्यांनी लेखी हरकत ही दिनांक 04/08/2022 रोजी, ग्रामपंचायत मौजे ममुराबाद येथे दिलेली असुन सदर लेखी हरकत दिल्याबाबतची स्थळप्रत देखील उपलब्ध आहे.

सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांच्या मर्जीतीलच व ठराविक दुकान, ट्रेडर्स व सप्लायर्स यांचेकडुन अवाजवी दराने शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी केलेले असुन सदर दुकानांमार्फत बनावट पावत्या तयार करुन ग्रामपंचायत ममुराबाद यांना सादर केलेल्या आहेत. सदर शालेय साहित्य व इतर साहित्य हे जळगांव जिल्ह्याबाहेरील दुकानामधुन, ट्रेडर्स व सप्लायर्स यांचेकडुन विकत घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसतांना देखील त्यांनी वर नमुद केल्याप्रमाणे शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी केलेले आहेत.ममुराबाद येथील कोणत्याही शाळेकडुन प्रस्तुत शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी करण्यापुर्वी, कोणतेही व कसल्याही प्रकारचे मागणीपत्र घेतलेले नसुन यांनी संगनमतानेच बेकायदेशीररित्या सदर साहित्य खरेदी केलेले आहे. स्वतःचा आर्थिक फायदा होण्याच्या मलीन हेतुने, शालेय साहित्य व इतर साहित्यांच्या एम. आर. पी. पेक्षा देखील अधिकची किंमत वर नमुद दुकान, ट्रेडर्स व सप्लायर्स यांना अदा करुन शासकीय रकमेचा अपहार केलेला आहे. अशाप्रकारे एकुण रक्कम रुपये 6,96,216/- इतक्या मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

सरपंच ग्रामसेवक यांनी वर नमुद शालेय साहित्य व इतर साहित्य ज्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधुन विकत घेतलेले आहेत, त्या 14 व्या वित्त आयोगाच्या कृती आराखड्यात अश्याप्रकारचा कोणताही खर्च करण्याची कसलीही कायदेशीर तरतुद नाही.यांना जर अशाप्रकारचा खर्च हा शासकीय निधीतुन करावयाचा होता, तर तो त्यांनी करण्यापुर्वी, म.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगांव यांची रितसर लेखी व कायदेशीर अशी पुर्वपरवानगी घेणे त्यांचेवर बंधनकारक व

जरुरीचे होते. परंतु अशी कोणतीही लेखी परवानगी आजतागायत यांनी घेतलेली नव्हती.

संबधीतांनी ज्या ज्या दुकानांमधुन, ट्रेडर्स व सप्लायर्स कडुन शालेय साहित्य व इतर साहित्य खरेदी केलेले आहे त्या सर्व दुकान, ट्रेडस व सप्लायर्स यांचेकडील त्या त्या शालेय साहित्याचे व इतर साहित्याचे, खरी, मुळ व वाजवी किंमत असलेले इस्टीमेट व कोटेशन देखील तक्रारदार यांचे कडे असल्याचेही त्यांनी सांगीतले. अशा प्रकारे सरपंच ग्रामसेवक यांनी शासकीय निधीचा अपहार करुन भ्रष्टाचार केलेला आहे.

संबधीत सरपंच व ग्रामसेवक यांचेवर प्रस्तुत लेखी तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येवून यांचेविरुध्द भा.दं.वि. 403, 406, 409, 420, 477 अ व 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महेंद्र सोनवणे जि प मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन यांचे करण्यात आलेली आहे.

Spread the love