चोपडा – तालुक्यातील कोळंबा येथील श्रीगुरूदेव सेवा मंडळ व जळगांव जिल्हा जयगुरुदेव संगतचे प्रार्थनागायक खंडू वामन बाविस्कर उर्फ खंडुजी महाराज यांच्या धम्माल खंजेरी भजन यूट्यूब चैनल साठी चोपडा येथील श्रीक्षेत्र, हरेश्वर महादेव मंदिरात विविध सामाजिक अध्यात्मिक धार्मिक भजन व भावगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केले होते. धम्माल खंजेरी भजन युट्युब चैनल साठी भजनांची व्हिडीवो शूटिंग एडिटिंग मिक्सिंग फोटोग्राफर मुन्ना रायसिंग (चहार्डी) यांनी केली आहे. संगीतसाथ कैलास परदेशी (हार्मोनियम), नरेंद्र गुरव (तबलावादक), टाळकरी व सहगायक एकनाथ महाराज, हरिश्चंद्र महाराज, प्रताप महाराज, दिलीप महाराज, साऊंड सिस्टिमसाठी सुरेश महाराज यांनी सहकार्य केले. प्रारंभी खंडु महाराज यांनी ईशस्तवन नामधुन करून “सब मिलकर करते है..स्वागत आज तुम्हारा” हे गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी मंदिराचे प्रमुख ओंकारनाथ महाराज,कोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कोळी (जळगांव), राजपूत गुरुजी (कळमसरे), बी.एन.पाटील (सनफुले), भरत कोळीसर, शशि सोनवणे, प्रल्हाद कोळी, न्हावीनाना, फुलचंद पाटिल यांचेसह भजनप्रेमींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले.
यावेळी धम्माल खंजेरी भजन युट्यूब चॅनल साठी खंडुजी महाराज यांनी वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित खंजेरी भजने.. “जागृत व्हा ना देवीदेवता..करा काही कल्याण आता”, “भक्ती विना उद्धार..नाही कुणाचा”, “दारू न बिघाडा..संसार ना गाडा”, “जमाने मे बदल..आजकल पड रहा है”, “आमुचा देश.. सुखाची खाण”, “ही का भक्ती खरी..पडते मन बाहेरी”, “मर्द मराठा वीर शिवाजी..अवतरले जगती”, “माझा निरोप एैकावा..गाव आदर्श पूर्ण व्हावा”, “राष्ट्रिय ध्वज हा प्रिय तिरंगा..अखंड राहो जैसी गंगा” असे एकसे एक बढकर मंत्रमुग्ध करणारी गीते व भजने सादर केलीत. भजनप्रेमींनी खंडु महाराज यांच्या धम्माल खंजेरी भजन यूट्यूब चैनल वरील ह्या गीतांचा लाभ घेऊन त्यांना लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करावे,असेही आवाहन सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे .











