जळगावात दूध संघाच्या निवडणुकीवरुन रणकंदन; भाजप आमदाराने थेट एकनाथ खडसेंचा बापच काढला!

0
48

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळाले आहे. माझा बाप काढता, तुमचा बाप काय धीरूभाई अंबानी होता काय?

असा सवाल करत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना भाजपचे आमदार चव्हाण यांनी थेट एकनाथ खडसे यांचा बापच काढला आहे. खडसे साहेब, तुम्ही माझ्या बापावर गेले म्हणून मला तुमच्या बापावर जायचं नाहीये आणि ही माझी पद्धती नाहीये असे स्पष्टीकरण देखील नंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलं आहे.

मुक्ताईनगरमधील 19 पैकी 11 उमेदवार हे जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र एकनाथ खडसे असा आखाडा रंगवतात की माझ्यासमोर कुस्ती खेळायला कोणी तयारच नाही. त्या ठिकाणी कुणीही पात्र संस्था तुम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर टीका केली आहे.

जर एकनाथ खडसे हे स्वतःला एवढे मोठे नेते समजत असतील तर त्यांना माझी भीती बाळगण्याचं कारण नाही. माझ्यासारख्या एवढ्या छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी बोलण्याचं कारण नाही मात्र वयोमानाने त्यांचा तोल जात असेल असा टोलाही आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.

खडसे यांनी स्वतःसाठी, कुटुंबाच्या फायद्यासाठीच पक्षाला वापरलं

एकनाथ खडसे यांनी स्वतःसाठीच आणि कुटुंबाच्या फायद्यासाठीच पक्षाला वापरलं. स्वतःकडेच त्यांनी पक्षाला गहाण ठेवलं. एकनाथ खडसे सांगतात की माझा बाप असा होता, माझा बाप तसा होता, मात्र एकनाथ खडसे यांचा बाप काय धीरूभाई अंबानी नव्हता, असे म्हणत खडसे हे वयाने मोठे असल्याने आम्ही काही ठिकाणी त्यांचा आदर करतो, मात्र त्याचा ते गैरफायदा घेतात, असा जोरदार घणाघात आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे.

 

Spread the love