इंदूरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस प्रशासन अलर्टवर

0
44

इंदूरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे. सध्या पोलिस शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या जुनी भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र टाकले होते. हा प्रकार दुकानमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. या पत्रात राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास बॉम्बने स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

Spread the love