अरे व्वा…आता एटीएममधून मिळणार गरमागरम इडली आणि तीही फक्त 55 सेकंदात !

0
45

ऐनवेळी भूक लागली. अशावेळी तुम्ही घराबाहेर आहात आणि परिसरात कुठेही उपाहारगृह नाही. अशा वेळी कल्पना करा की, तुमच्याकडे कोणता पर्याय उपलब्ध असेल किंवा रात्री उशिरा ऑफिसमधून घरी आला आहात आणि ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीदेखील शक्य नाही. अशा वेळी काय कराल? या दोन्ही प्रसंगांवेळी भूक भागवण्याच्या एका सर्वोत्तम पर्यायाचा शोध लागला आला आहे. त्यामुळे खवय्यांना आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या इडली मशीनचा व्हिडियो शेअर केला आहे. फ्रेश हॉट नावाच्या स्टार्टअप कंपनीने बंगळुरुमध्ये हे इडली एटीएम बनवले आहे. असे मशीन की , अवघ्या 55 सेकंदांत गरमागरम इडली सर्व्ह करते. इतकंच नाही तर ताजी आणि स्वच्छ इडली बनवणारे हे मशीन ग्राहकांच्या समोरच ग्राहकांनी ऑर्डर केलेला पदार्थ तयार करून तिचे पॅकिंग करते. म्हणजेच 1 मिनिटापेक्षा कमीत कमी वेळात मशीनमधून आलेले इडलीचे पाकीट ग्राहकाच्या हातात मिळते. या मशीनवर मेन्यु स्कॅन करून ग्राहक त्यांची ऑर्डर देऊ शकतात. इडलीसोबत आवडीप्रमाणे पुडिंग, चटणीची ऑर्डर देता येऊ शकते. याशिवाय याचे पेमेंटदेखील तुमच्या फोनवरूनच केले जाते. हे पूर्णपणे स्वयंचलित इडली एटीएम एका वेळी 27 इडली ऑर्डर करू शकते.

आनंद महिंद्रा यांनी इडली एटीएम मशीनचा व्हिडियो ट्विटरवर शेअर केला असून त्याला त्यांनी कॅप्शनही लिहिलं आहे. त्यांनी लिहिले की, अनेकांनी रोबोटिक फूड तयार करणे किंवा वेंडिंग मशीन शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, या मशीनमध्ये FSSAI च्या सुरक्षा मानकांची काळजी घेण्यात आली आहे आणि इडली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य योग्य प्रकारे, ताजे आणि स्वच्छ ठेवण्याचीही व्यवस्था केली जाईल. बंगळुरुवासीयांनी इडलीची चव कशी आहे? हे सांगावे. जगभरातील मॉल्स किंवा विमानतळांवर असे इडली मशीन ठेवल्यास मला आनंद होईल. ही खूप मोठी ‘सांस्कृतिक निर्यात’ असेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Spread the love