आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री नामदार मा. विजयकुमार गावीत साहेबदि. २४/०९/२०२२ रोजीजळगाव जिल्हा दौ-यावर आले असता जळगाव महानगर चे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजु मामा भोळेयांच्या निवासस्थानी भेट घेतली. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढुन आदीवासी विकास विभाग व सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्रातील आदिवासी अन्यायग्रस्त जमाती बांधवांवर षडयंञ रचुन २१ /१२/२०१९ चा अधिसंख्य पदाचा अन्याकारक शासन निर्णय काढला .३०-३५ वर्ष नोकरी केल्यावर आदिवासी कर्मचारी बांधवाना ११ महिन्याच्या मुदतीवर अधिसंख्य केले. काही कर्मचारी बांधव सेवानिवृत्त झाले

सेवानिवृत्त होऊन काही वर्ष झाले अजुनही त्यांच्या हक्कांचे मेहनतीचे निवृत्ती नंतरचे लाभ दिले जात नाहीत याबाबत मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांना तात्पुरते पेन्शंन देणे बाबत आदेश दिला परंतु संबधित प्रशासन या निर्णायाकडे दुर्लक्ष करून आदिवासी कर्मचारी बांधवावर अन्याय करत आहेत तर आदिवासी विभागात पुरेसे पुरावे सादर करून हि जात प्रमाणपञ मिळु देत नाही दिले तरीही काही तपासणी समित्यां चे अधिकारी आपला पदाचा दुरुउपयोग करून दिलेल्या वैधता रद्द करण्याच्या दृष्टीने दिलेल्या वैधतांना नोटिस देऊन अन्यायकारक कारभार करत आहेत या सर्व गंभीर मुद्द्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी नेते डॉ दशरथ भांडे साहेब यांच्या नेतृत्वात आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने दि. १५ सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले . आदिवासी विकास मंत्री या नात्याने आपण या सर्व अन्यायकारक विषयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपल्या अधिपत्याखाली मंत्रालयात राज्यस्तरीय बैठक आयोजित अधिसंख्य पदावर असलेले कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील समस्त अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाचा गांभीर्याने विचार करून आम्हास आमचे अधिकार आरक्षण न्याय हक्कासाठी शासन दरबारी विषय मांडावा व २१/१२/२०१९ चा अधिसंख पदाचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावाअशी सविस्तर चर्चाप्रल्हाद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री नामदार
मा. विजयकुमार गावीत साहेब यांच्या सोबत केली यावेळी माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेबां सोबत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले आमदार मा. राजु मामा भोळे यांनी ही महत्त्वपूर्ण भेट घडवून आणली या वेळी माजी आमदार मा. स्मिताताई वाघ भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सुर्यवंशी सरचिटणीस विशाल भाऊ त्रिपाठी, डॉ राधेश्याम जी चौधरी, नितीन इंगळे, प्रमोद वाणी, राहुल वाघ चेतन तिवारी धिरज वर्मा यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते











