निंभोरा बुद्रुक येथे वार्ड क्र.6 मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
42

निंभोरा –  या गावात एकुण 6 वार्ड आहेत. त्यांपैकी वार्ड क्रं 1 ते 5च्या तुलनेत वार्ड क्रं 6 चा‌‌ परिसर क्षेत्रफळाच्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने खुप मोठा आहे. तरीही ग्राम-प्रशासन वार्ड क्रं. 6 वरती सातत्याने दुर्लक्ष करुनच आहे. कारण एकच का निधी पुरत नाही म्हणून आजपर्यंतही या वार्डाचा विकास नाही. या वार्ड क्रमांक 6मधील निंभोरा पोलीस स्टेशनमागील दलितवस्ती या परिसरातील लोकांच्या जिवांशी आजही खेळ चालूच आहे. ग्रामपंचायतीने नेमुन दिलेला दिवस शनिवार हा कचरा वाहुन नेणे गटारी साफ करणे.या कामांसाठी असुन 1 महिना झाला .ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी व ग्रामपंचायतीचे ट्रॅक्टर कचरा वाहुन नेण्यासाठी या परिसरात येत नसुन फक्त लोक प्रतिनिधी राहत असलेल्या परिसराजवळूनच स्वच्छता कर्मचारी ग्रामपंचायतीचे ट्रॅक्टर परत फिरते .

अक्षय नाना तायडे. यांच्या घरासमोर असलेल्या ओपन प्लेसमधील सांडपाण्याची विल्हेवाट ग्रामप्रशासनकडून आजपर्यंतही झालेली नसुन या पाण्यामध्ये सर्पांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगजंतु , प्लास्टिक , कचरा यांच्या वाढीमुळे दुर्गंधी पसरत आहे.व डासांच्या प्रमाणातही वाढ झाली असुन साथीचे , श्वसनाचे आजार अश्याप्रकारची रोगराई वाढत आहे.

 

या परिसराला लागुनच जि.प.मराठी मुलांची शाळा व अंगणवाडी आहे. या शाळांच्या आवारातही कचरा व गवताची वाढ झालेली आहे व ओपनस्पेसमध्येही गवत वाढले असुन जमिनीचे रूपांतर दलदलीच्या भुभागामध्ये झाले आहे. गेल्या एक वर्षात या परिसरातील पावसाच्या पाण्याचे डबकेही बालीश टाकून बुजल्या गेले नाही. या सर्व प्रकार पासुन

लोकप्रतिनिधी , सरपंच , ग्रामविकास अधिकारी परिचित आहेत. तरीही ग्राम-प्रशासन काम करीत नसुन फक्त हो चे पाणी पाजण्यात व्यस्त आहे.

अश्या ग्रामप्रशानाचा फायदा तरी काय? 

या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तणनाशक फवारणी करणे , डबके / खड्डे बुजणे. ही सर्व कामे त्वरीत करावी. शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या व रहिवासीयांच्या आरोग्याशी चालू असलेला खेळ त्वरित बंद करून नियोजित कामे करावी.

Spread the love