प्रतिनिधी जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसीम येथील रहिवाशी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भुसावळ तालुका अध्यक्ष विलास पाटील यांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ॲड.शिला गोगावले व राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कट्यार (राजस्थान) यांच्या हस्ते प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
समाजसेवा हीच सर्वोच्च साधना तर राष्ट्रसेवा हाच सर्वोच्च धर्म मानून आपण समाजहित, राष्ट्रहित, आणि मानवतेच्या सेवेसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रेरणादायी व आदर्शवत कार्य करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविले असून आपल्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन समाजभूषण पुरस्कार हा मानाचा पुरस्कार श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या वतीने आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे आपल्या कार्यातून समाजात निर्माण झालेले प्रेरणा नेतृत्व सेवाभाव आणि कर्तृत्व भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरो असा उल्लेख समाजभूषण पुरस्कारात करण्यात आला आहे.
जळगाव येथील सुदर्शन पॅलेस येथे महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांच्या भव्य दिव्य कार्यक्रमात विलास पाटील यांना हा समाजभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री उमेशभाऊ नेमाडे, विद्यार्थी युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, भुसावळ शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी),युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, डॉ. वसंतराव झारखंडे, विलाससिंह पाटील सारोळा, संदीप सिंह राणा, दामूसिंग राजपूत, लल्लाभाई मोरे, ॲड. देवकांत पाटील, विक्रामसिंग जवानसिंग पाटील ( कल्याण ) , सरपंच सौ.निलप्रभा पाचपांडे,पोलीस पाटील सचिन वायकोळे, मुख्याध्यापक खेडकर सर, किशोर विक्रमसिंग पाटील, किशोर लोहार, समाधान पाटील विनोद माळी, राजूधनगर, अजय सपकाळे यांनी अभिनंदन केले आहे.











