शिंदे गटाला 40 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मला वाटतं शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच पूर्ण अधिकार आहे. संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र. पक्षाचे तसे नसते, पक्षावर कार्यकर्त्यांचाच हक्क असतो असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबान चिन्ह गोठविण्याची मागणी केली. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर घटनापीठाने ही सुनावणी पुढे ढकलली. दरम्यान, यावरुन पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले.
शिंदे गटाचे समर्थन करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहतो. त्यामुळे कार्यकर्त्यांचाच पक्षावर अधिकार असतो. संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. पण पक्षाचे तसे नसते. कार्यकर्ते म्हणजेच पक्ष असतो. शिंदे गटातील 40 आमदारांनी हिंदुत्त्वाचा विचार केला आणि राष्ट्रवादी, काँगेससोबतच्या सत्तेला लाथ मारली. पण अजूनही काहीजण खुर्चीच्या प्रेमात आहेत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.










