जळगाव – तालुक्यातील व इतर परिसरात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शनिवार रात्री पासुन मुसळधार पाऊस कोसळल्याने ममुराबाद मध्ये जळगावहुन येणाऱ्या लेंडी नाल्याचे घरांनमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जळगाव तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शनिवारी रात्री पासुन मुसळधार पाऊस कोसळल्याने गावभर पाणी झाले होते. या पावसामुळे नाले तुंबल्यामुळे ममुराबाद येथील कानळदा रस्त्याकडील भिल्ल वस्ती भागात अनेक घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.
शनिवारी रात्रभर पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी घरानमध्ये पाणी गेल्याने घरात तील भांडे पाण्यामध्ये वाहून गेले .तसेच घरातील तील अन्नधान्य देखील पावसामुळे भिजून गेले . जोरदार पाऊस झाल्याने लहान-मोठ्या नाल्यांना देखील पूर आला होता. तर नाल्यांना पुढे पाणी वाहाण्यास अडथळा असल्याने अनेक घरात पाणी घुसले होते. घरांमध्ये पाणी घुसल्याने संसारपयोगी वस्तू भिजल्या होत्या. गुडघाभर पाणी घरामध्ये शिरले होते. पुर्ण भील्ल वस्तीमध्ये पाणीच पाणी भरले होते . तेथील नागरीकांनी ग्रामपंचायत प्रशासना कडुन मदत मिळावी अशी मागणी केली दुपार पर्यन्त भील्ल वस्तीतील कुंटूब रस्त्यावरच होते. परंतु लोक प्रतिधींनी साधी विचारणा देखील केली नसल्याने तेथील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी पाऊस झाल्यानंतर रविवारी दुपारनंतर पुन्हा पावसाचे वातावरण झाले होते . दुसरीकडे ममुराबाद हुन विदगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर हातेड नाल्याला देखील मोठा पुर आल्याने काही वेळ वाहातुक बंद झाली होती . पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर वाहातुक सुरळीत सुरु झाली होती.












