संजय चौधरी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी… ! 

0
49

हेमकांत गायकवाड

चोपडा: श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श संताजी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो .यावर्षी चोपडा येथील कस्तुरबा हायस्कूल चे विद्यार्थी प्रिय शिक्षक तथा तेली समाजाचे माजी अध्यक्ष व सध्याचे विश्वस्त संजय कौतिक चौधरी यांना जिल्हास्तरीय आदर्श संताजी सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा चोपडा तेली समाजाचे अध्यक्ष के. डी. चौधरी सर यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली व त्यांचा संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे सत्कार करण्यात आला. सदरचा पुरस्कार एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचे के. डी .चौधरी यांनी सांगितले. यावेळी के .डी .चौधरी व संस्थेचे उपाध्यक्ष टी. एम .चौधरी यांनी शिक्षकांच्या सेवेचा गौरव केला. यावेळी प्राचार्य अनंत लालचंद चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ रत्नाताई अनंत चौधरी ,नारायण पंडित चौधरी, सुनील हिरालाल चौधरी , प्रकाश श्रावण चौधरी , ज्ञानेश्वर राजाराम चौधरी, गोपीचंद रघुनाथ चौधरी ,महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष देवकांत के.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या या पुरस्काराबद्दल एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love