नंदूरबार येथे महाबुद्धविहाराचे ७ रोजी लोकार्पण

0
15

जळगाव – नंदूरबार येथील शहादा बायपास येथे दिनांक ७ फेब्रूवारी २०२४ रोजी अत्यंत भव्यदिव्य असे जेतवन महाबुद्ग विहार तसेच भव्य बुद्धशिल्प , धम्मरथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक यांचा लोकार्पण सोहळा सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.

कंबोडीया चे वरिष्ठ मंत्री उक रॅबन, कंबोडीया चे उप पंतप्रधान यांचे सहाय्यक चोम शौबिया तसेच प्रसिद्ध सिनेअभिनेते गगन मलिक त्याचप्रमाणे महाथेरो बोधी पालो, पूज्य भदंत धम्म रक्षित, पूज्य भदंत गुणरत्न हे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध गायक राहुल अन्वीकर, भास्कर अमृतसागर यांचा बुद्ध, भीम गितांचा कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अण्णासाहेब रमण साळवे, प्रा. डॉ. प्रकाश भामरे, प्रा. श्रीकांत पवार परिश्रम घेत आहेत, या कार्यक्रमास महाराष्ट्रातुन हजारो नागरिक येणार आहेत, जळगाव जिल्ह्यातून हि जनतेने मोठ्या संखेने पांढरे कपड़े परिधान करुन सहभागी व्हावे असे आवाहन साहित्तिक जयसिंग वाघ, जमनादास अहिरे, नथू अहिरे यांनी केले आहे.

Spread the love