दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे’; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार?

0
38

मुंबई -: परप्रांतियांच्या मग्रुरीकडे लक्ष न देता मराठी द्वेषाने पछाडलेल्या भाजप खासदार निशिकांत दुबेने ठाकरेंना पटक पटक के मारेंगे अशी धमकी दिली. एवढंच नाही तर मराठी माणूस युपी बिहारींच्या पैशांवर जगतो, असे अकलेचे तारे तोडले…

त्याच दुबेला राज ठाकरेंनी मिरा-भाईंदरच्या सभेत डुबो डुबो कर मारेंगे म्हणत उत्तर दिलंय…

तर राज ठाकरेंच्या भुमिकेनंतर आता शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी दुबेच्या नांग्या ठेचण्यासाठी राजकीय वस्त्र बाजूला ठेवण्याची तयारी दाखवलीय….तर राज ठाकरेंनी एकट्या दुबेला नाही तर भाजपला आव्हान दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय…

दुसरीकडे खासदार दुंबेंनतर आणखी एक भाजप खासदार मनोज तिवारींनीही अकलेचे तारे तोडलेत. तर दुसरीकडे डुबो डुबो कर मारेंगे इशाऱ्यानंतर निशिकांत दुबेने ट्वीट करुन मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का? असा खोचक टोला लगावलाय… त्यामुळे मराठी द्वेषी दुबेला ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर त्याचं शेपूट वाकडंच असल्याचं दिसून आलंय.. त्यामुळे भाषेवरुन आगामी काळात ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे…

Spread the love