रमाबाई यांना ‘ शेण, गवऱ्या ‘ तून बाहेर काढण्याचे जयसिंग वाघ यांचे भावनिक आवाहन

0
5

जळगाव :-  रमाबाई यांचे संपूर्ण जीवन शेण , गवऱ्या गोळा करण्यात , त्या विकण्यात , उपाशी राहण्यात , फाटक्या लुगड्यात राहण्यात गेले असेच लिखाण बहुतांश लेखक , कवी , गायक यांनी केलेले आहे . मात्र हे फक्त काही अंशी खरे आहे , पण यातून त्यांच्या उर्वरित जीवनाकडं पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याने त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे भावनिक आवाहन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .
रमाबाई आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त अजिंठा हाउसिंग सोसायटीतील जेतवन बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , रमाबाईंच्या जीवनात १९१३ ते १९२० पर्यंतच दुःख , दारिद्र्य आलेले आहे . १९२० पासून बाबासाहेब प्राध्यापक, प्राचार्य, बॅरिस्टर, आमदार, विविध शासकीय समित्यांचे सदस्य राहिलेले आहेत . त्यांचा पगार , मानधन, सोई सवलती बघता त्या शेण , गवऱ्या गोळा करून, त्या विकून उदरनिर्वाह करत असतील, दिवस दिवस उपाशी राहत असतील हे सिद्ध होत नाही .
इंजिनीयर ममता सपकाळे यांनी रमाबाई यांच्या कार्याचे महत्व विषद करून त्यांचा त्याग आपणास प्रेरणा देत राहील असे सांगितले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलिप सपकाळे होते , त्यांनीही मार्गदर्शन केले . प्राचार्या विजया शेजवळे , सिंधू तायडे , चंद्रगुप्त सुरवाडे यांच्या हस्ते भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कविता सपकाळे , सरला भालेराव यांनी त्रिसरण , पंचशील म्हटले , प्रास्ताविक संचालक पी. डी. सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन शुभांगी बोदोडे यांनी केले .

कार्यक्रमास ॲड. आनंद कोचूरे, विजय भालेराव , शशिकांत पवार , संजय सपकाळे , डॉ. उल्हास तासखेडकर , सुमन बैसाने , अंजना भालेराव , हिराबाई भालेराव , प्रतिभा सपकाळे , रंजनी सैंदाणे, संगीता सैंदाणे आदींसह स्त्री , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love