महाराष्ट्रातील महिलांचे बचत गट.मायक्रो फायनान्स चे कर्ज केंद्रसरकारने माफ करावे.

0
51

जळगाव – लाकडाऊन मुळे लोकांना अजुनही हाताला काम नाही . लॉक डाऊन काळात घरातील होती तेवढी जमा पूंजी दैनंदिन गरजेसाठी खर्च झाली त्यात दोन वेळेचे जेवण आजारपण शालेय शिक्षण ऑनलाईन केली गेली . दोन मुले असणाऱ्या परिवाराची तर तारेवरची कसरत झाली. बर्‍याच परिवारात रोजच्या गरजा पूर्ण करता येत नाही तर तिथे मोबाईल कुठून घ्यायचा बरीच मंडळी भाडोत्री घरात राहतात घरभाड्यासाठी घरमालकांचा तगादा आर्थिक आवक बंद. अश्यात घरभाडे भरायचे कसे?

लॉकडाऊन काळात बन्याच लोकांना मोठ्या प्रमाणात दवाखान्यांना सामोरे जावे लागले . अश्यात बऱ्याच लोकांनी व्याजाने पैसा घेतला. मात्र लाकडाऊन वाढत गेले .आर्थिक लाभाचे कुठलेही साधन नाही. त्यात पैसे देणाऱ्यांनी अरेरावी, शिवीगाळ धमक्या असे मार्ग अवलंबले महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी कर्ज उपलब्ध केले जात आहे. ज्यात महिला छोटे-छोटे लघुउद्योग व्यवसाय करून आपल्या परिवाराला हातभार लावत आहेत. प्रत्येक कर्ज घेणाऱ्या स्त्रीया या स्वाभिमानी आहेत आजवर घेतलेले कर्ज वेळेवर फेडले गेले. मात्र लॉकडाऊन लागले तेव्हापासून त्यांचे व्यवसाय देखील बंद पडले. आवक नसल्यामुळे हप्ता भरायचा कुठून? तसेच बचत गटातील वसुली करणारे प्रतिनिधी कर्जदारांच्या घरी येऊन तगादा लावतात, दोन दोन, तीन तीन तास बसून राहतात, अपमानास्पद वागणूक मिळते. हा सगळा प्रकार घरातील सर्व सदस्यांसमोर होत असल्यामुळे बरेच कुटूंब माणसिक ताण (स्ट्रेस) एंझायटी डिप्रेशन सारख्या आजारांनी ग्रस्त झालेले आहेत. कारण आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी त्यांना मार्गच नाही.

ह्यातच कुटूंबासह आत्महत्या करण्याचे प्रमाण खुप वाढले. ह्यामागची त्या कुटूंबातील सदस्य कुठल्या माणसीकते तूमन जातात ह्याचा थोडा विचार करावा, तरुण पिढी जी देशाचे भविष्य आहे, ती सहजरित्या का विषप्राषण/ गळफास लावुन घेत आहे? विचारमंथन करून त्यावर उपाययोजनेची गरज आहे. नुसती आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी मोजण्याची ही वेळ नाही. महाराष्ट्रातील महिलांचे बचत गटाचे कर्ज केंद्रसरकारने माफ करून त्यांना ह्या ओझ्यातुन जर मुक्त केले तर त्यांना नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी विचारआ णि प्रयत्न करण्यास संधी मिळेल आणि त्या मानसिकतेतून बाहेर निघायला एक संधी मिळेल.जर बचत गटांचे कर्ज माफ करू शकत नसाल तर इच्छामरणाची परवानगी द्यावी. कारण कर्जदारांच्या कुटूंबातील लोकांना अश्या परिस्थितीत बघणे आणि ह्या परिस्थितीला सामोरे जाणे आता शक्य होत नाही. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Spread the love