ना.संजय सावकारेंच्या प्रयत्नाने भुसावळ – गोंभी बससेवा सुरू !

0
4

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोंभी गावात कोरोना काळापासून बससेवा या ना त्या कारणाने बंद करण्यात आली होती.त्यामुळे गोंभी येथील सरपंच काजल भोजराज कोळी व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सतत गावात एसटी सेवा सुरू करण्याची मागणी करीत होते.या बाबत ना.संजयभाऊ सावकारे यांच्या कडे ही एसटी सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. गोंभी येथून शालेय शिक्षणासाठी विद्यार्थी सुनसगाव येथे जातात त्यामुळे पालकांनी सुद्धा सरपंच यांच्या कडे मागणी केली होती. या बाबत ना.संजयभाऊ सावकारे यांनी भुसावळ बस डेपो व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला होता तसेच भोजराज कोळी यांनी वारंवार संपर्क साधला अखेर दि.२० जुलै रोजी सकाळी १० वाजे दरम्यान भुसावळ बेलव्हाळ एसटी गोंभी मार्गे वळविण्यात आली.आता दररोज ही एसटी सकाळी व दुपारी भुसावळ – वांजोळा – गोजोरे – गोंभी – सुनसगाव व बेलव्हाळ अशा मार्गाने ये – जा करणार आहे. या आधी कै.माजी सरपंच रत्नाकर ओंकार कोळी यांनी गोंभी गावात जळगाव – गोंभी व जळगाव – वराडसीम व्हाया गोंभी मार्गे एसटी सेवा सुरू केली होती. गावात एसटी सेवा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करताना चालक वाहक यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रंजना पाटील,सामाजिक कार्यकर्ते भोजराज कोळी , माजी सदस्य ईश्वर कोळी , मराठी शाळेचे मुख्याध्यापक देवरे गुरुजी, माजी पोलीस पाटील रमेश पाटील,आबा पाटील व गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love