अण्णा भाऊ एक उपेक्षित व्यक्तिमत्व

0
3

३५ कादंबऱ्या , १५ कथा संग्रह , १२ चित्रपट संवाद , १० पोवाडे , १ नाटक , १ प्रवास वर्णन लिहिणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन.

अण्णा भाऊंचे अनेक साहित्य २५ पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ २००२ मध्ये ४ रुपयाचे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले. २०२२ मध्ये मॉस्को ( रशिया ) येथील ऑल रशिया स्टेट लायब्ररी मध्ये त्यांचा पुतळा रशिया सरकारने बसविला. २७ नोव्हेंबर २०२२ ला त्यांना छ. संभाजी नगर येथील महात्मा गांधी मेमोरियल युनिव्हर्सिटी तर्फे मरणोत्तर डिलीट पदवी प्रदान केली. त्यांनी कामगारांचे अनेक लढे लढले आहेत . संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय तन्मयतेने काम केले आहे. मार्क्सवादाने प्रभावित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्याकामी खर्ची घातले.

त्यांचा ‘ स्टालिनग्राडचा पोवाडा ‘ तुफान गाजला या पोवाड्याने त्यांना रशियात तुफान लोकप्रियता मिळाली. त्यांनी दलीत, आदिवासी, भटके या लोकांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडले. १९४२ च्या ‘ चले जाव ‘ आंदोलनात सक्रिय भाग घेतला व एकाच कार्यक्रमात २ लाख पेक्षा अधिक रक्कम गोळा करून कम्युनिस्ट पार्टीला पार्टी फंड म्हणून मिळवून दिला. संपूर्ण जीवन चळवळीला समर्पित करणारे , प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर पोहाचणारे , लोकशाहीरीच्या माध्यमांतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे , दिल्लीत जाऊन आपल्या शहीरीने केंद्र सरकारला घाम फोडणारे अण्णा भाऊ साठे मात्र त्यांच्या उत्तरायुष्यात अत्यंत हलाखीचे जिणे जगतात . जेवणाला , औषधाला सुद्धा पैसे नसणाऱ्या अण्णा भाउंना कित्येक दिवस अन्ना वाचून काठावे लागले.  त्यांचा आज स्मृतिदिन

अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.

जयसिंग वाघ 

जळगाव 

९८८१९२८८८१

Spread the love