जळगाव दिव्यांग व वृद्धांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
9

तीन दिवसीय शिबिरात ९४० लाभार्थ्यांना साहित्य वाटप; तपासणी शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : येथील लाड वंजारी, मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे आचार्य श्री हिराचंद्रजी मा. सा. भावी आचार्य परम श्रद्धेय महेंद्रचंद्रजी मा. सा. श्री. प्रमोद मुनी यांच्या प्रेरणेने तसेच श्रीमती सुदादेवी हिरावत व कै. श्री. टिकमचंदजी हिरावत यांच्या स्मृतीनिमित्त श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर यांच्या माध्यमातून दिव्यांग व वृद्धांसाठी तीन दिवसीय मोफत साहित्य वाटप व तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

दिनांक ०५/०८/२०२६ ते ०७/०८/२०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात दिव्यांग व वृद्ध लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिरात दिव्यांगांना कृत्रिम पाय (जयपूर फूट), पांढरी काठी, कॉलिपर, कृत्रिम हात (जयपूर फूट), तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या तसेच दिव्यांग व वृद्धांना कानाचे मशीन व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. तपासणीनंतर एकूण १४० लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले.

या साहित्य वाटप कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच जयपूर समितीचे चेअरमन श्री. डी. आर. मेहता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. शिबिरासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या उद्योगपती श्रीमती नीताजी डांगा, श्री. राजीवजी डांगा, माजी आमदार मनीष दादा जैन, सुशीलजी बाफना, महावीर बोथरा, अनिल बोथरा, सुनील बाफना, श्रीमती तारादेवी बाफना, सुदादेवी केशवमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळगावकर तसेच माजी उपमहापौर करीम सालार यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिबिरात दिव्यांग व वृद्धांना पद्मश्री पुरस्कार विजेते तथा जयपूर समितीचे चेअरमन श्री. डी. आर. मेहता साहेब आणि प्रमुख अतिथी माजी आमदार मनीष दादा जैन यांनी मार्गदर्शन केले.

आयोजकांचे परिश्रम

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन रत्न हितेशी श्रावक संघ व युवक परिषद तसेच शिबिर समितीचे प्रमुख राजेश सांखला, विमल संघवी आणि राजेंद्र कोठी यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिव्यांग व वृद्ध बांधवांना आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. गरजू लाभार्थ्यांना आवश्यक साधने उपलब्ध झाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार आहे.

शिबिर प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र कोळी यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

Spread the love