भारतीय किसान संघ नंदुरबार जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न

0
3

भारतीय किसान संघ नंदुरबार जिल्हा कार्यकारणीची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला पद्मश्री पुरस्कार प्राप्त, भारतीय किसान संघाचे क्षेत्र संघटन मंत्री तथा प्रसिद्ध कापूस तज्ञ श्री. दादा लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी श्री. दादा लाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मासिक बैठका, कार्यकर्त्यांमधील समन्वय, तालुका समिती तसेच ग्राम समितीच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले.

तसेच भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांत मंत्री श्री. सुभाष बापू महाजन यांनी आगामी प्रांत अभ्यास वर्ग, तुळजापूर येथील नियोजन, भगवान बलराम जयंती उत्सव तसेच सदस्य नोंदणी अभियानाबाबत मार्गदर्शन केले. नंदुरबार जिल्ह्यातील ५० गावांमध्ये भगवान बलराम जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

बैठकीला राज्य कृषिभूषण तथा भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र माळी यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा मंत्री श्री. प्रसाद बहिरे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य विजयराव सोनवणे, तुकाराम रजाये, विजय पाटील, जगदीश शिरसाठ, सुप्रिया दादा ठाकरे, हर्षल पत्की, संतोष चौधरी साळी आदी उपस्थित होते.

बैठकीत आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

Spread the love