प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील रहिवासी गं भा अनुसयाबाई वेडू पाटील यांचे दि.११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते त्यांचा सारी सावटण्याचा कार्यक्रम दि.१३ नोव्हेंबर रोजी होता तेव्हा सामाजिक कार्यकर्ते अनिल वेडू पाटील यांनी आईच्या अस्थी नदीत विसर्जित न करता आपल्या शेतात खड्डा खोदून त्या ठिकाणी आई अनुसया बाई यांची आठवण म्हणून वटवृक्ष व आंबा यांचे वृक्षारोपण केले. या अनोख्या उपक्रमाने नातेवाईक व ग्रामस्थ भारावले. विशेष म्हणजे हे वृक्ष त्यांचे जवळचे नातेवाईक श्रीकृष्ण सटाले सर व पाहुणे श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लावण्यात आले. गावातील प्रत्येक नागरिकांनी असंच नवनवीन उपक्रम राबवावे वृक्ष लागवडीमुळे एक आदर्श कार्यक्रम गोजोरे येथे पार पडला.












