बलिप्रतिपदेनिमित्त कुऱ्हे पानाचे येथे पारंपरिक तळी उचलण्याच्या कार्यक्रमातून बळीराजाच्या सन्मानाचा जागर !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो! या मंगल आणि प्रेरणादायी घोषणेतून बलिप्रतिपदेच्या निमित्ताने कुऱ्हे (पानाचे) येथे शेतकरी पाणी हक्क समितीच्या वतीने पारंपरिक तळी उचलण्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून समाजाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राजा बळी यांच्या लोककल्याणकारी विचारांचे स्मरण करत शेतकऱ्यांचा सन्मान, शेतीसाठी पाण्याचा हक्क आणि शेतकरी एकजुटीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब एकनाथराव बडगुजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जी. के. दादा पाटील, नथ्यू वराडे दादा, रविंद्र गांधेले,निवृत्ती बावस्कर श्री मधुकर सपकाळे उपस्थित होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील कष्टकरी शेतकऱ्यांचा रुमाल, टोपी ,सन्मानपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. शेतात राबणाऱ्या हातांचा, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या बळीराजाचा आणि समाजाच्या अन्नसाखळीचा आधार असलेल्या अन्नदात्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावणारा ठरला. यांचा गौरव करण्यात आला प्रभाकर कुंभार, सुरेश तेली, दिनकर सुतार, नामदेव वराडे, मुरलीधर भाई, प्रीतम पारधे, समाधान आठवले, रमेश बावस्कर, अशोक काळे, मोहन ताडे, गोकुळ कोळी, हिरा परदेशी, राजू बडगुजर, मानसिंग जाधव, यासीन मन्यार, अमोल बिल, दिनेश गांधेले, संतोष पारधी या शेतकऱ्यांचा सन्मान हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून त्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा देण्याची कृती आहे. राजा बळींच्या समतेच्या, समृद्धीच्या आणि लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन करत शेतकऱ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, हा संदेश या सन्मान सोहळ्यातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास चौधरी यांनी केले. त्यांनी बलिप्रतिपदेचे महत्त्व विशद करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन प्रमोद उंबरकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. अरविंद बावस्कर यांनी केले.

सुधाकर बडगुजर यांनी तडी उचलण्याचे व पाणी शेतीचे महत्व सांगितले.

तळी उचलण्याच्या पारंपरिक विधीमधून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा, शेतीला सिंचनाचे पाणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने बळीराजाचे राज्य येणार नाही, असा सामूहिक विचार यावेळी अधोरेखित झाला.

पाण्याचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न —

कुऱ्हे पानाचे परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बलिप्रतिपदेचा हा उत्सव केवळ धार्मिक किंवा पारंपरिक सोहळा न राहता शेतकरी हक्क, पाणी आणि एकजुटीच्या चळवळीला बळ देणारा ठरला.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, शिवारात हिरवाई आणि प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचावे अशी राजा बळींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमाला काशिनाथ पाटील,जगन पाटील, संजय वराडे, संदिप महाजन,प्रकाश चौधरी, छगन वराडे , गोकुळ कोळी, प्रकाश उंबरकर, विलास चौधरी या मान्यवरांनी तळी उचलून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाप्रसंगी रविंद्र बोबडे,मधुकर पाटील, प्रविण नागपुरे शशिकांत वराडे, आण्णा गुरूजी, चंद्रकांत बावस्कर, विलास रंदाळे,एन. डी पाटील रमेश जाधव, कसदास जाधव, श्रीकांत बरकले, संजू शिंदे, गोपाल अस्वार, श्रीदत्त गुरू भजनी मंडळ विनोद कोळी, राकेश बारी, एकनाथ पाटील रमेश कोळी, बापू पाटील, यांची उपस्थिती लाभली

आयोजक : शेतकरी पाणी हक्क समिती, कुऱ्हे (पानाचे).

Spread the love