युवक तालुका राष्ट्रवादी तर्फ रस्ता दुरुस्ती साठी. सार्वजनीक बांधकाम विभागाला निवेदन

0
50

दिपक नेवे

यावल -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ब्रहानपूर अंकलेश्वर मार्ग यावल ते चोपडा या दरम्यान खूप खराब झाला असून खूप मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे निर्माण होऊन वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची डागडुजी झाली असली तरी ती पाहिजे तशी झालेली नाही तरी तो रस्ता नव्याने करावा व त्याच प्रमाणे विरावली ते दहिगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे तरी आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व विरावली दहीगाव रस्ता दुरुस्ती किंवा नव्याने तयार करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही निवेदनाद्वारे करत आहोत तरी आपण लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमकपणे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयावर भविष्यकाळात आंदोलनांचा ईशारा दिला आहे

सदर माहिती साठी  

नितींजी गडकरी साहेब परिवहन व महामार्ग मंत्री भारत सरकार. अशोक जी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य

श्रीमती रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघ.

मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्या कडे प्रत दिली आहे.निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष देवकांत पाटील राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष नरेंद्र शिंदे तालुका संघटक राहुल चौधरी , तालुका सरचिटणीस रोहन महाजन , संघटक अक्षय बोरोले विरावली शाखा अध्यक्ष गिरीष पाटील तालुका समनव्यक किशोर माळी ,उपाध्यक्ष पवन पाटील बादशा पाटील आदींची उपस्थिती होती .

Spread the love