दिपक नेवे
यावल -तालुक्यातील दहिगाव येथून यावल कडे जाणाऱ्या मार्गावरील रसत्याची अतिशय वाईट अशी खड्डेमय अवस्था झाल्याने या मार्गावरून रोज ये जा करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नाकडे मात्र स्थानिक आमदार आणी खासदार तथा लोकप्रतिनिधींचे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गावरील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती न झाल्यास त्यामुळे संत्पत परिसरातील शेतकरी ग्रामस्थ या विषयाला घेवुन आंदोलनाच्या पवित्र्यात आल्याचे दिसत आहे . काही दिवसापुर्वी परिसरातील युवकांनी रस्ता तात्काळ दुरूस्त व्हावे या करीता गांधीगिरी करूनही सुस्त अधिकाऱ्यांना याची जाणीव नसल्याचे दिसून येत आहे. सन 1999 पासून म्हणजे चार वर्षापासुन कायम वर्दळीचा विरावली दहिगाव रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही तसेच यावल विरावली रस्त्याचे डांबरीकरण होऊन हा रस्ता खड्ड्यांच्या जाड्याने गुंफला गेलेला आहे यावल दहीगाव संपूर्ण आठ किलोमीटरचा रस्ता पूर्ण कपडे लाखो खड्डे निर्माण करून झालेला आहे या खड्ड्यांमधून दुचाकी चारचाकी वाहने चालवणे अवघड झालेले आहे रात्रंदिवस वर्दळ असलेला हा रस्ता लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित पणाने खराब झाला आहे याच रस्त्याबरोबरच इतर गावांकडे जाणारे रस्ते मात्र त्वरित दुरुस्त होत आहेत ही खेदाची बाब मानली जात आहे दहीगाव सावखेडा सिम विरावली कोरपावली महेलखेडी मोहराळा हरीपुरा येथील ग्रामस्थ बांधकाम विभागावर तसेच स्थानिक आमदार व खासदारांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. रस्ता त्वरित तयार करावा अशी मागणी जोर धरीत असून शेतकरी तथा ग्रामस्थ रस्ता न झाल्यास आंदोलन करतील असा इशाराही जानके ग्रामस्थांकडुन देण्यात येत आहे.












