कोरपावली ग्रामपंचायतीचे ६८ लाख बिल थकीत असल्याने पाणि पुरवठा व विद्युत पुरवठा खंडित.

0
16

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल -तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतीने विद्युत वितरण कंपनीचे _विज बिल भरले नाही वीज पुरवठा खंडित_ करण्यात आला आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून स्टेट लाईट व सार्वजनिक पाणीपुरवठा होण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने करे कोण व भरे कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यापूर्वी स्टेट लाईट व पाणीपुरवठा यांचे वीज बिल जिल्हा परिषद मार्फत मार्फत जात होती गेल्या दीड वर्षापासून ती रक्कम ग्रामपंचायतीने भरायची आहे .भरली न गेल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला विद्युत बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने भरावयाची होती अशा प्रकारचे निर्देश 15 वित्त आयोगाच्चा निधीतून बाराव्याचे आदेश संपूर्ण ग्रामपंचायतींना प्राप्त झाले होते परंतु कोविड काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आले होते त्या कालावधीत ग्राम विकास अधिकारी व पंचायत समितीचे विस्ताराधिकारी ग्रामपंचायतीचे दैनंदिन व धोरणात्मक कामे हाताळत होते परंतु आता ग्रामपंचायत निवडणूक कार्यकाळ एक वर्ष पूर्ण झाला असल्याने संबंधित ग्रामपंचायतीने वीज पुरवठा थकबाकि रक्कम न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या संबंधित अभियंता धांडे यांच्या आदेशाने पालन करून कर्मचाऱ्यांना टोकाचे पाऊल उचलु न गावाचा सार्वजनिक पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Spread the love