ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे निधन

0
47

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेली 16 दिवस पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांनी हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया सारख्या हिंदी चित्रपट काम केले आहेत. तसेच त्यांनी नटसम्राट, गोदावरी या मराठी चित्रपटात भुमिका केल्या होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विक्रम गोखले यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी सकाळी बालगंधर्व सभागृह येथे आणण्यात येणार आहे.

Spread the love