श्रद्धा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला तिहाड तुरुंगामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
आफताब पूनावाला याची पोलीस रिमांड आज संपणार होती. त्यामुळे त्याला आंबेडकर रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
A Delhi court sends Shraddha murder case accused Aftab Poonawalla to judicial custody.
(file photo) pic.twitter.com/qwn38YCaYP
— ANI (@ANI) November 26, 2022
श्रद्धा वालकर हिची निर्घृणपणे हत्या करून तिचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला याची 28 नोव्हेंबरला नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीस सोमवारी रोहिणी येथील आंबेडकर रुग्णालयात नार्को टेस्ट करण्याची शक्यता आहे, अशी माहिती एएनआयने दिलीय. नार्को टेस्टदरम्यान एफएसएलचे पथकही उपस्थित राहणार आहे. आज आफताब पूनावाला याची वैद्यकीय तपासणी झाली, यात तो फिट असल्याचे दिसून आल्याने लवकरच त्याची नार्को टेस्ट होणार आहे.
Shraddha murder case: Accused Aaftab to undergo narco test on Nov 28
Read @ANI Story | https://t.co/GVsPX8GPR9#Shraddha #ShraddhaWalkar #ShraddhaMurderCase #AaftabPoonawala pic.twitter.com/Sd6TQZslIF
— ANI Digital (@ani_digital) November 26, 2022
दरम्यान, आफताब पूनावाला आपला जबाब वारंवार बदलत असल्याने तपास भटकत असल्याचे म्हणत पोलिसांनी न्यायालयाकडे त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयानेही नार्को टेस्टची परवानगी दिली आहे. याआधी गुरुवार-शुक्रवारी त्याची पॉलीग्राफ टेस्टही झाली होती.
वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने अत्यंत थंड डोक्याने तिची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. पुरावा मिटव्यासाठी रोज रात्री तो यातील एक तुकडा जंगलामध्ये फेकत होता. या हत्याकांडाचा सहा महिन्यांनी खुलासा झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने तीन करवतींच्या ब्लेडचा वापर केला होता. हत्येसाठी वापरलेले ब्लेड आणि करवत डीएलएफ गुरुग्राममध्ये आपल्या कार्यालयाजवळ फेकल्याचे आफताबने चौकशीत सांगितले आहे.











