ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली

0
48

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट-मालिका आणि नाट्यसृष्टीत शोककळा पसरल्याने अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

”विक्रम गोखले गेले यावर विश्वासच बसत नाही. काल परवापर्यंत ते तसे माझ्या संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असत. एक कसदार राजबिंडा अभिनेता म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य होते. हिंदी सिनेसृष्टीतील तो एक लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते, पण दुर्दैव. मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो”. अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Spread the love