बारावीच्या गुणांआधारे बीएस्सी नर्सिंगला प्रवेश

0
45

राज्यातील बीएस्सी नर्सिंगच्या 5,164 जागांसाठी बारावीच्या गुणांआधारे नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि खासगी नर्सिंग स्कूल अॅण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन कामाला लागले आहे. सर्व नर्सिंग कॉलेज व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक आणि इच्छुक विद्यार्थ्यांसोबत नवीन प्रवेश पद्धतीवर चर्चा करण्यासाठी उद्या, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत ऑनलाइन सत्र राबविण्यात येणार आहे.

खासगी नर्सिंग स्कूल अॅण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी आणि मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील व्ही. डी. होन मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या 6 हजार 400 जागा होत्या, त्यापैकी पहिल्या फेरीत 1236 जागांवार नीट पर्सेंटाईलच्या आधारे प्रवेश झाले आहेत. उर्वरित 5 हजार 164 जागांवर नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यात बारावीचे इंग्रजीसह पीसीबी गटात मिळालेले गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

Spread the love