कित्येत तास डाऊन राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाली जिओची सेवा

0
44

मंगळवार सकाळीच जीओची सर्व्हिस डाऊन झाल्यामुळे जीओ धारकांना बराचवेळ त्रास सहन करावा लागला. ना कॉल जात होते ना एसएमएस. आधार होता तो फक्त व्हॉट्सअॅप कॉलिंग मेसेंजिंगचा ते ही वायफाय असलेल्यांनाच. अनेकांनी ट्विटरवरून याबाबत रिलायन्सकडे तक्रारही केली. अखेर दोन ते तीन तास सेवा ठप्प राहिल्यानंतर पुन्हा एकदा जीओ सेवा सुरू झाली.

कॉलिंग सेवा ठप्प झालेली असताना जिओचे इंटरनेट मात्र चांगल्या स्पीडने चालू होते. त्यामुळे किमान ग्राहकांना व्हॉट्सअॅपची सोबत होती. व्हॉट्सअॅपरवरून लोकांना व्हिडीओ व्हॉईस काता येत होते. अनेत नेटकऱ्यांनी ट्विटरवरून रिलायन्सकडे याबाबत तक्रार केली.

 

Spread the love