आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते सुनसगाव – गोजोरा रस्त्याचे भूमिपूजन !

0
47

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर –

भुसावळ-: येथील बेलव्हाळ चौफुलीवर आ. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर कामाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यामुळे येथील चौफुलीवर भुमी पूजन फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी आमदारांनी गावातील रस्त्याची पाहणी केली तसेच रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन , वंदना उन्हाळे , मनिषा पाटील , सरपंच दिपक सावकारे , भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील , ग्रामसेविका रत्नमाला घुले , पत्रकार जितेंद्र काटे , चेअरमन सुदाम भोळे तसेच ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन व संचालक मंडळ तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावातील व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .

Spread the love