‘राज ठाकरे चूहा है’ म्हणणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार, मनसे विरोध करणार?

0
46

मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत त्यांना उंदीर म्हणणारे उत्तरप्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंहपुण्यात येणार आहेत. त्यामुळे मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मनसे बृजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नसल्याचे पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे  यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने 15 जानेवारीला बृजभूषण सिंह पुण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी कोणतंही भाष्य करु नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे बृजभूषण यांच्या दौऱ्याला मनसेकडून कोणताही विरोध होणार नाही.

यासंदर्भात बोलताना वसंत मोरे म्हणाले, बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंना तात्विक विरोध केला होता. याचा अर्थ त्यांना अयोध्येत येऊ दिलं नाही, असा नाही. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे अयोध्येला गेले नव्हते. मात्र, मनसैनिकांनी त्याच दिवशी आयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं. राज ठाकरेंना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अडवण्याची कोणाच्यात ताकद नाही. आमच्या अंगाला दहा वर्ष महाराष्ट्राची लाल माती लागली आहे, आम्हालाही रंग दाखवता आला असता, पण राज ठाकरेंचे आदेश आहेत, त्यामुळे काही बोलता येणार नाही, असं वसंत मोरे म्हणाले.

Spread the love