लावणी पोरकी झाली ! ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन

0
42

साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

सुलोचना चव्हाण यांनी सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, आंबा आलाय पाडला, पावणा ;पुण्याचा आलाय गं.. अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

Spread the love