समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

0
48

बहुप्रतीक्षित हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. नागपूर ते शिर्डी हा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी रविवारी सकाळी नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नियोजित कार्यक्रमानुसार नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा आणि समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मुंबई – नागपुर समृद्धी महामार्ग हा मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प म्हणून पहिला जात आहे. एरव्ही मुंबई ते नागपूर हे 812 किमी अंतर कापण्यास 14 तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे हे अंतर 700 किमी झाले असून आता फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होणार आहे.

समृद्धी महामार्ग नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही या जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

Spread the love