भारतीय दलीत साहित्य अकादमी तर्फे भारत रत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्काराने प्रल्हाद भाऊ बोंडे सन्मानित

0
41

रावेर – दिनाक ११ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली येथे भारतीय दलीत साहित्य अकादमी तर्फे संपुर्ण भारत देशामधुन निंभोरा येथील सहकार क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय प्रल्हाद भाऊ बोंडे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सहकार आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आज पर्यंत सामाजिक , सहकार , शैक्षणिक , राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेत भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले असुन त्यांच्या सोबत जळगाव येथील प्रेमचंद मनुरे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सहाय्यक अधीक्षक अभियंता जळगाव याना डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विशेष सेवा सन्मान राष्ट्रीय पुरस्कार तर त्यांची पत्नी अनीता मनुरे याना त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार,तर जळगांव येथील डॉ.स्वाती गायकवाड यांना राजमाता जिजाबाई भोसले राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांना डॉ. बाबा साहेब आंबेडकर फेलो सिफ गाते येथील सरपंच सुनीता बाळू तायडे यांना डॉ. बाबा साहेब आंबेडकर फेलोशिफ तर यावल येथील देशदूत चे ज्येष्ट पत्रकार अरुण देवराम पाटील यांना महात्मा जोतिबा फुले फेलोशिफ देण्यात आली.यावेळी फॉर्मर युनियन मिनिस्टर डॉक्टर सत्यनारायण जतीया चैअरमन पी. एस. सी.कॅमिटी रेल्वे मंत्रालय दिल्ली रमेशचंद्र रत्न हेल्थ मिनिस्टर हरयाणा डॉ. एम. एल. रंगा निरज् रॉय स्पोर्ट मिनिस्टर नेपाल डॉ.सोहनपाल सुमनाक्षर,जय सुमनाक्षर, भारतीय दलीत साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी , माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम प्रा.संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या उपस्थिती मध्ये ११ डिसेंबर २०२२ रोजी पंचशील आश्रम दिल्ली येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले .राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बदल सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे माजी मंत्री एकनाथ खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी सतीश पाटील आमदार शिरीष चौधरी अँड रवींद्र भैय्या पाटील रोहिदास ढाके डॉ. एस. डी. चौधरी डॉ.चेतन फेगडे सुनील कोंडे विलास चौधरी उज्जेंनसिंह राजपूत ईत्यादि नी अभिनंदन केले आहे.

Spread the love