शहरातील आर. एल. ज्वेलर्स येथे मंगळवारी सीबीआय कडून (CBI) छापेमारी करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मात्र नेमकी कोणत्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे? चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.
20 ते 25 जणांचे सीबीआयचे पथक जळगावात दाखल
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस ते पंचवीस जणांचे सीबीआयचे पथक जळगावात दाखल झाले आहे. सराफ बाजारातील आर एल ज्वेलर्स येथे सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे, चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून मोठी गोपनीयता पाळली जात आहे. चौकशीसाठी आलेले अधिकारी सीबीआयचे अधिकारी असल्याची सूत्रांची माहिती सांगण्यात येत असलं तरी याबाबतचा कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. तर आर एल ज्वेलर्स यांनी सुद्धा माहिती देण्यास नकार दिला आहे, एकीकडे चौकशी सुरू असताना दुसरीकडे ज्वेलर्स दुकानात मात्र ग्राहकांची ये-जा सुरू होती.











