रावेर प्रतिनीधी – राजेंद्र महाले
रावेर – येथील सब स्टेशन जवळ विवरा रस्त्यावर असलेल्या पूर्वा वे ब्रिज या तोल काट्यातील दि.२४ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बॅटरीसह मुद्देमाल व ऐवज लंपास केला.सविस्तर वृत्त असे की,गेल्या ०३ ते ०४ दिवसांपासून निंभोरा,तांदलवाडी,विवरा या गावांमध्ये ही चोऱ्यांचे प्रकार वाढले.दरम्यान दि २४ च्या रात्री विवरा रस्त्यावर राजीव भोगे यांच्या मालकीचे असलेल्या पूर्वा वे ब्रिजच्या तोल काट्याचा दरवाजा व ग्रील तोडत बॅटरी व इतर साहित्याची चोरी करीत पसार झाले.या बाबतची तक्रार रविंद्र वसंत भोगे यांनी तक्रार दिल्यावरून निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय रा का पाटील,पोहेकॉ विकास कोल्हे करीत आहेत.










