आजपासून आरटीपीसीआऱ बंधनकारक, ‘या’ सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम

0
54

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केल्याने अख्ख्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सगळे देश सतर्क झाले आहेत हे लक्षात घेऊन हिंदुस्थान सरकारनेही काही कठोर पावले उचलली आहेत.आजपासून हिंदुस्थानात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआऱ चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिर्वाय करण्यात आले आहे. त्यामुळे पददेशातून हिंदुस्थानात परतायचे असेल तर आजपासून आरटीपीसीआर चाचणी गरजेची आहे.

नवीन वर्ष देशात कोरोनाचा मोठा धोका पोहोचू शकतो. याबाबत आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चाळीस दिवस कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असू शकतात. त्यामुळे कोरोनाचा मागचा ट्रेंड पाहिला तर सर्वात मोठा धोका इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांकडून आहे. यामुळे आज 1 जानेवारी 2023 पासून देशात आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एअर सुविधा पोर्टल लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने चीनसह हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे.त्यासाठी प्रवासापूर्वी प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर सादर करणे गरजेचे आहे.ज्यांनी ही चाचणी केलेली नसेल त्यांना हिंदुस्थानाता प्रवेश घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच कर्नाटक सरकारने शनिवारी जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही नियमावली दिली आहे. यामध्ये जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी 7 दिवसांचे होम क्वारंटाइन अनिवार्य आहे,तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले येईल असेही म्हंटले आहे.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वीय सचिव पीके मिश्रा यांनी 22 डिसेंबरला देशातील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांची बैठक घेतली होती.चीनची पहिली लाट हिंदुस्थानात पोहोचायला 7 महिने लागले असले तरी आता तसे नाही आहे. कोरोनाचा BF-7 हा व्हेरिएंट 15 पट वेगाने संसर्ग पसरवतो आणि त्यामुळे हिंदुस्थानातही त्याचा वेगाने प्रसार होण्याचा धोका आहे.

Spread the love