अक्षय केळकर बिग बॉस मराठीचा विजेता! अपूर्वा नेमळेकर उपविजेती

0
45

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनचा विजेता कोण होणार, याविषयी सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर, रविवारी रात्री रंगलेल्या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धक अक्षय केळकर याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले असून तो विजेता ठरला आहे, तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली आहे. अक्षयला 25 लाख 55 हजार रुपये मिळाले आहेत.

अंतिम सोहळ्यात विजेतेपदासाठी अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने या स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना रंगला. अखेर खेळाडूवृत्ती, टास्कमधली मेहनत, स्पष्टवत्तेपणामुळे चर्चेत असणाऱ्या अक्षयने बाजी मारली.

Spread the love