राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय की राहुल गांधींनी त्यांच्या पांढऱ्या टीशर्टखाली घातलंय काय?
राहुल गांधींचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पांढऱ्या टीशर्टची चर्चा होत होती. आता राहुल गांधींनी घातलेल्या थर्मलची चर्चा होऊ लागली आहे.राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये केवळ पांढरा टीशर्ट घालून फिरतात. पण तरीही त्यांना थंडी का वाजत नाही? या प्रश्नाची चर्चा होत होती. आता ते शर्टच्या आत थर्मल घालतात, हे नेटकऱ्यांनी फोटोंवरुन उघड केलं आहे.
Look at the shirt. Buttons of T shirts buttoned up.Look at his chest Ist the ghere some think thick inside. The wrinkles show there is something below. A thick shield.
Lease check @RahulGandhi May be another Faker . pic.twitter.com/jCgnpjVCUB
— Himanshu Jain (Modi ka Parivar) (@HemanNamo) January 6, 2023
तसंच आता राहुल गांधी यांचं सत्य समोर आलं, असं म्हणत ट्वीटही केलं आहे. राहुल गांधींची शर्टचं बटण लावण्याची पद्धत, त्यांच्या शर्टला पडलेल्या सुरकुत्या, तसंच शर्टमधून दिसणारा थर्मल यावरुन नेटकऱ्यांनी हा अंदाज लावला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
राहुल गांधींच्या विरोधात कमेंट करणाऱ्यांनी त्यांना डिवचलं आहे. नुसता टीशर्ट घातल्याचं नाटक करत असल्याची टीका केली आहे. तर राहुल गांधींविषयी एवढा अभ्यास कऱण्यापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे, असं म्हणत राहुल गांधींच्या समर्थकांनी सुनावलं आहे. कमेंट वॉरला त्यामुळे उधाण आलं आहे











