Amazon Sale: सुरू होतोय वर्षातील पहिला बंपर सेल, फोन-टीव्ही निम्म्या किंमतीत खरेदीची संधी

0
47

ई-कॉमर्स साइट Amazon ने Great Republic Day Sale ची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपासून या सेलला सुरूवात होणार आहे. प्राइम मेंबर्ससाठी सेल २४ तास आधीच सुरू होईल.

१५ जानेवारीपासून सुरू होणारा हा सेल २० सेलपर्यंत चालेल. 

Amazon Great Republic Day Sale सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्स, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. सेलमध्ये SBI कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

५जी स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये अवघ्या ९९९ रुपये किंमतीत तुम्ही अनेक शानदार प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. याशिवाय, रात्री ८ आणि १२ वाजता खास ऑफरचा फायदा मिळेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बेस्टसेलर स्मार्टफोन्स ४० टक्के, इलेक्ट्रॉनिक्स व अ‍ॅक्सेसरीजवर ७५ टक्के आणि होम अ‍ॅप्लायन्सवर ६० टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.

Amazon चा हा वर्षातील पहिला सर्वात मोठा सेल आहे. ग्राहकांना सेलमध्ये ५जी स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही अवघ्या १०,९९९ रुपये किंमतीत Lava Blaze 5G स्मार्टफोनला खरेदी करू शकता.

अवघ्या ९९ रुपयात मिळेल अनेक वस्तू

Amazon वरून तुम्ही खूपच कमी किंमतीत अ‍ॅक्सेसरीज खरेदी करू शकता. येथे अवघ्या ९९ रुपये सुरुवाती किंमतीत स्मार्टफोन कव्हर, चार्जिंग केबल, स्क्रीन गार्ड आणि मोबाइल होल्डर खरेदी करता येईल

सेलमध्ये Xiaomi Mi 5x 4K स्मार्ट टीव्ही ३० हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल. तर Samsung Galaxy Tab S7 FE ला ३४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय, इतर प्रोडक्ट्सवर देखील ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.

Spread the love