बँड बँजो कलाकारांची बे अब्रू करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या महेश मांजरेकर च्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन, महाराष्ट्रात उजळ माथ्याने फिरू देणार नाही-प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव….

0
46

सोलापुर-:बँड बँजो कलाकारांची बे अब्रू करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या महेश मांजरेकर च्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करून त्याला महाराष्ट्रात उजळ माथ्याने फिरू देणार नाही-प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव…. . आज दिनांक 13 जानेवारी रोजी कोरेगाव येथील केदारेश्वर मंगल कार्यालयामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रमुख बँड मालकांची व महाराष्ट्र राज्य बँड बँजो चालक कलाकार संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

.सदर बैठक संघटनेचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीस प्रदेश सचिव सुभाषराव अडागळे,प्रांत उपाध्यक्ष सुभाषराव जाधव,प्रांतिक संघटक माजी उपसभापती आनंदराव भोंडवे, प्रांत सदस्य बाळासाहेब जाधव,प्रांत सदस्य कोल्हापूरचे आतिश कदम ,जिल्हाध्यक्ष सचिनराव वायदंडे ,जिल्हा कार्याध्यक्ष फारुख भाई बागवान ,जेष्ठ कलाकार प्रदीप साळुंखे ,उत्तमराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. .सदर बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा होऊन पुढील आगामी काळामध्ये कलाकारांच्या आडचणी व त्यांच्या प्रश्नानबाबत चर्चा होऊन योग्य ते सर्वांना हितकारक निर्णय घेण्यात आले . .

सदरच्या बैठकीमध्ये नुकत्याच सोशल मीडियावर बँड बँजो कलाकारांना महेश मांजरेकर यांनी जे अश्लील,उग्र व कलाकारांना अपमानित करण्याचा जो प्रयत्न एका वेब सिटीज मध्ये केलेला आहे याबाबत पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मनोगतामध्ये तीव्र समाचार घेऊन त्याचा धिक्कार केला. .काल दिनांक 12 जानेवारी रोजी राज्य संघटनेच्या व जिल्हा संघटनेच्या वतीने सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून त्याला अटक झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन कलाकारांच्या तीव्र भावना पोलीस प्रशासनाकडे नोंदवलेल्या आहेत. .एवढ्यावर ही कलाकार मंडळी आजच्या बैठकीमध्ये समाधानी नसताना संघटनेच्या माध्यमातून सोमवार दिनांक 16 जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व कलाकार आपल्या ड्रेस कोड व वाद्यासह एकत्र येऊन मान्यवर नेते मंडळी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निदर्शने करून महेश मांजरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.तशा पद्धतीने उपस्थित बँन्ड मालकांनी निर्णय घेऊन आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. .

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँड मालक व कलाकार 16 जानेवारी रोजी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जोडो मारो आंदोलन यशस्वी करणार आहेत. .सदर बैठकीमध्ये किल्ले मच्छिंद्रगडचे जयसिंगराव पवार व धर्मा मास्तर यांची नियुक्ती राज्य कार्यकारणी वरती करत असताना वाई तालुक्यातील श्री जयसिंग रोकडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. .बैठकीनंतर कामगार कल्याण महाराष्ट्र शासन यांचे विभागामार्फत व असंघटित वर्गात मोडणाऱ्या कलाकारांसाठी त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने कामगार मंत्रालय कडून मिळणारे शासकीय लाभ यासाठी ” ई श्रम कार्ड ” ची नोंदणी करून सदर कार्डाचे वितरण कलाकारांना देण्यात आले . .

सदर बैठकीचे आयोजन कोरेगांव तालुकाध्यक्ष गणेश साळुंखे मास्तर,विशाल माने मास्तर, संतोष चव्हाण मास्तर,प्रल्हाद माने, दाऊद भाई मास्तर, दशरथ माने, सुरेश माने सर यांनी उत्तम प्रकारे केले होते. .सदर बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष फारुख भाई बागवान,ओंकार साळुंखे,सुनील शेलार (फलटण ) ,महादेव जाधव ढवळ,करून साठे ,साहेबराव माने, मधुकर भिसे ( वाई ),हनुमंतराव माने,अजय पवार,भानुदास गोळे, उत्तम जाधव, दीपक हिरालाल जाधव, संतोष शिवाजी माने, संजय उत्तम भिंगारदिवे, सुरेश चव्हाण, शामराव चव्हाण, राजू पवार,रवींद्र चव्हाण,प्रकाश पवार, सर्जेराव पवार, सिकंदर पवार, विजय वसंत चव्हाण, सुनील तानाजी पवार, संजय जंयवत जाधव,बाबुराव दत्तू पवार, विजय आण्णा फुलवरे ,योगेश रामचंद्र जाधव, सनी दत्तात्रय माने,संतोष वायदंडे, विलास दुबळे, निवास कमाने, दिलीप सदाशिव माने ,तुकाराम माने, जगन्नाथ आढागळे,उत्तम मास्तर, सागर जाधव, शामदेव ज्ञानेश्वर जाधव ,गणेश रामचंद्र घाडगे, रमेश दत्तू पवार, शिवाजी पवार,भाऊसाहेब जाधव,उमेश पवार,परमेश्वर आडागळे, संजय बबन घाडगे, सुरज वसंत चव्हाण इ.बँड मालक बैठकीसाठी वाई, सातारा, फलटण, खटाव, कराड, खंडाळा, माण, किल्ले मच्छिंद्रगड व कोल्हापूर भागातील बँड मालक उपस्थित होते.

Spread the love